महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rape Threatening Suicide : आत्महत्येची धमकी देत नातेवाईक तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर बलात्कार - अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार

पिडीत मुलीचा जवळचा नातेवाईक असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या करेन (Threatening Suicide) अशी धमकी देत १७ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (a relative raped a minor girl) केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली असून पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारी नंतर या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल (Rape case filed) करण्यात आला आहे.

Hadapsar Police Station
हडपसर पोलीस स्टेशन

By

Published : Apr 9, 2022, 1:42 PM IST

पुणे:हडपसर पोलीसांनी (Hadapsar Police Station) दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही सतरा वर्षाची आहे आणि आरोपी बावीस वर्षाचा आहे. आरोपी आणि पिडीत तरुणी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. काही दिवसांपूर्वी या २२ वर्षीय आरोपीने आपण दोघेही लवकरच लग्न करू असे सांगत पिडीत तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण याला पिडीत तरुणीने विरोध केला.

त्यानंतर तो दोन वर्षापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि तुझ्याशी लग्न करणार आहे, अन्यथा मी आत्महत्या करेल अशी भीती दाखवली (Threatening Suicide) आणि पीडित तरुणीची इच्छा नसतानाही हडपसर परिसरातील लॉजमध्ये घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध (a relative raped a minor girl) ठेवले. त्यानंतर पिडीत तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला त्यानंतर आईने हडपसर पोलीस स्टेशन गाठले आणि याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी यावरुन गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा : Rape of a minor girl : पुण्यात अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details