पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील परिचरिकांनी कायमस्वरुपी करण्याच्या मागणीसाठी भर पावसात आंदोलन केले. हाताला काळ्या फिती बांधून वायसीएम समोर प्रशासनाच्या निषेधार्थ निदर्शने करत नारेबाजी केली.
पिंपरीत परिचारिकांचे भर पावसात आंदोलन हेही वाचा -रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात गेल्या १० ते १२ वर्षांपासून परिचारिका मानधनावर काम करत आहेत. कोरोनाच्या भयावह परिस्थितीत काम केले, परंतु पालिकेने आमच्याकडे सहानुभूती न दाखवता आमच्या मागण्यांना नेहमीच टोलवाटोलवी केली आहे, अस परिचरिकांचे म्हणणे आहे. सर्व मानधनावरील परिचरिकांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी सामावून घेण्यास प्रशासन दिरंगाई करीत आहे. याच्या निषेधार्थ स्टाफ नर्स यांनी लाक्षणिक आंदोलन व काळ्या फिती लावून निदर्शने केली.
दरम्यान, आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळाने जोरदार पाऊस आला, मात्र परिचरिकांनी विचलित न होता भर पावसात आंदोलन सुरूच ठेवल. यावेळी परिचरिकांना घोषणाबाजी करत महानगर पालिकेने कायमस्वरुपी आस्थापनावर घ्यावे, अशी मागणी केली. या आंदोलनावर महानगरपालिका प्रशासन नक्कीच विचार करेल, अशी आशा
परिचारिका कल्पना पवार, योगिता पवार, पूनम शिवशरण यांनी केली.
हेही वाचा -MAHARASHTRA BREAKING : पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक