पुणे -पिंपरी-चिंचवड येथे 67 वर्षीय व्यक्तीने पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीला दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 21) रोजी घडली आहे. मुलीची तब्बेत बरी नसल्याने तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले त्या दरम्या हा प्रकार समोर आला आहे.
दवाखान्यात लैंगिक अत्याचार झाल्याचे झाले उघड
या घटनेबद्दलची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पीडित मुलीची तब्बेत बरी नसल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले, त्यानंतर या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. यातील आरोपी हा शेजारीच राहणारा असून मुलीला विश्वासात त्याने हे कृत्य केले आहे. त्याला अटक केली असल्याची माहिती दिघी पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -स्वतःच्या डेथ इन्शुरन्ससाठी केला बनाव, मनोरुग्णाला सर्पदंश देऊन केले ठार; पाचजण अटकेत