महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरीत खंडणी मागत कापड दुकानदारावर कोयत्याने वार; तीन अल्पवयीन मुलं ताब्यात - demanding ransom

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी मार्केट येथे असणाऱ्या कापड दुकानात अल्पवयीन तीन मुलांनी खंडणी मागत दुकानदाराला धमकावत कोयत्याने वार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कासीम अस्लम शेख याने पिंपरी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले आहे.

दुकानदारावर कोयत्याने वार
दुकानदारावर कोयत्याने वार

By

Published : Sep 15, 2021, 10:49 AM IST

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी मार्केट येथे असणाऱ्या कापड दुकानात अल्पवयीन तीन मुलांनी खंडणी मागत दुकानदाराला धमकावत कोयत्याने वार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कासीम अस्लम शेख याने पिंपरी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरीत खंडणी मागत कापड दुकानदारावर कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड नावाचे कापड दुकान आहे. तिथे सोमवारी तीन मुले आली. व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर पैसे द्या, असे म्हणून त्यांनी खंडणी मागितली. त्यानंतर दुकानातील कामगार तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. घटनेत दोन तरुण जखमी झाले असून दुकानाचे मोठे नुकसान केले आहे. घटनेने पिंपरी मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पिंपरी मार्केट येथे भीतीचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details