महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबेगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

आंबेगाव तालुक्यातून नारोडी येथे नातेवाईकांच्या लग्नाला निघालेल्या एका शेतकऱ्यावर दोन बिबट्याच्या बछड्याने हल्ला केल्याची घटना गुरूवारी घडली. या हल्ल्यात गोरक्ष घुले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घोडेगाव ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

By

Published : Nov 15, 2019, 8:36 AM IST

Updated : Nov 15, 2019, 11:16 AM IST

गोरक्ष घुले

पुणे -आंबेगाव तालुक्यातून नारोडी येथे नातेवाईकांच्या लग्नाला निघालेल्या एका शेतकऱ्यावर दोन बिबट्याच्या बछड्याने हल्ला केल्याची घटना गुरूवारी घडली. या हल्ल्यात गोरक्ष घुले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घोडेगाव ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आंबेगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

हेही वाचा - राष्ट्रपती राजवटीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद

गोरक्ष घुले हे शेतकरी आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी घरातून दुचाकीवर बाहेर पडले. नारोडी गावाच्या लगत रस्त्याने जात असताना बिबट्य़ाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कंबरेला व छातीवर बिबट्याने पंजाने जखमा केल्या आहेत. गोरक्ष यांनी एका हाताने गाडी सावरत डाव्या हाताने जोरदार झटका देऊन बिबट्याला मागे सारले. परंतु, बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला चढवला. त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - औरंगाबादच्या बेगमपुरा पोलिसांवर आरोपी सोडून फिर्यादीला शोधण्याची वेळ

Last Updated : Nov 15, 2019, 11:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details