पुणे - प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर आधीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. यामध्ये काही आगीच्या घटना किरकोळ तर काही गंभीर स्वरूपाच्या असतात. पुण्यात मागील पाच दिवसात आगीच्या सात घटना घडल्या आल्या आहेत. या आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे तर कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले.
भंगार दुकानाला आग
शुक्रवारी (26 मार्च) गंज पेठेतील मासेआळी येथे भंगार मालाच्या एका दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानात झोपलेल्या एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवले. तर याच दिवशी सायंकाळी खराडीतील एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीतील पाच दुकाने आणि पहिल्या मजल्यावर असणारे एक डायग्नोस्टिक लॅब जळून नष्ट खाक झाली होती.
हेही वाचा-पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड
फॅशन स्ट्रीटला आग
याच दिवशी (शुक्रवारी) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 500 हून अधिक दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. यामध्ये फॅशन स्ट्रीटमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे करोडोंचे नुकसान झाले आहे. रात्री अकरा वाजता लागलेली ही आग एक वाजण्याच्या सुमारास विजली. तोपर्यंत या ठिकाणी करोडो रुपयांचे नुकसान झाले. रात्रीची वेळ असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
पार्किंगमध्ये केमिकल लीक
सोमवारी दुपारी कर्वे रस्त्यावरील पुणे सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल लीक झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य धोका दूर केला.