जुन्नर (पुणे) - बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात घडली. नऊ वर्षाच्या पोटच्या लेकीवर नराधम बापानेच अत्याचार केला. याप्रकरणी लेकीवर बापानेच अत्याचार केल्याची तक्रार आईने ओतूर पोलिसांत दिली आहे
पोटच्या लेकीवर अत्याचार-
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात नऊ वर्षाची मुलगी शनिवारी दुपारी घरात ऐकटी खेळत होती. दरम्यान, नराधम बापाने मुलगी ऐकटी असल्याचा फायदा घेऊन पोटच्या लेकीवर अत्याचार केला. त्यानंतर काही वेळाने मुलीची आई घरी आल्यानंतर हा संपुर्ण प्रकार पिडित मुलीने आईला सांगितला.