दौंड - दौंड शहरातील हॅाटेल शांताईचे मालक आणि श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक लक्ष्मण नलगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. दादासाहेब लक्ष्मण नलगे (वय ३७, रा. दौंड ) असे आत्महत्या केलेल्या तरूण व्यवसायिकाचे नाव आहे. आज सकाळी त्यांनी डोक्यात पिस्तूल मधील गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या -
दादा नलगे यांनी आज (शनिवारी) सकाळी राहत्या घरी स्वत:च्या पिस्तूल मधील गोळी झाडून आत्महत्या केली. दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या तारामती अपार्टमेंट येथील राहत्या घरी ही घटना घडली. दादासाहेब नलगे यांचा मोठा मित्र परिवार दौंड परिसरात आहे. या घटनेची महिती समजल्याने मित्र परिवारात एकच खळबळ उडाली.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही-
दौंडमध्ये व्यवसायिकाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या - sucide news
दादा नलगे यांनी आज (शनिवारी) सकाळी रहात्या घरी स्वत:च्या पिस्तुल मधील गोळी झाडून आत्महत्या केली. दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या तारामती अपार्टमेंट येथील राहत्या घरी ही घटना घडली.
दादासाहेब लक्ष्मण नलगे
दौंड पाटस रोडवर असलेल्या हॉटेल शांताईचा व्यवहार हे दादासाहेब पाहत होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. नलगे दौंड व श्रीगोंदा तालुक्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामामुळे परिचयाचे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
हेही वाचा-'कोरोनावरील लस सुरक्षित असून नागरिकांनी संकोच बाळगू नये'