महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Riots Investigation: सातारा दंगली प्रकरणी तपास 'एनआयए'कडे द्यावा; मानवाधिकार परिषदेची मागणी - सातारा दंगलीचा तपास

Satara Riots Investigation : ऑगस्ट-सप्टेंबर 2023 दरम्यान सातारा शहर (Satara Riots) आणि जिल्ह्यातील पुसेसावळी येथे जी दंगल घडली होती त्याबाबत माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी (Police Officer Avinash Mokashi) यांच्या भारतीय मानवाधिकार परिषदेने (Human Rights Council of India) अहवाल तयार केला आहे. त्यात त्यांनी सातारा दंगली प्रकरणी पाकिस्तानातील नंबरचा तपास (Number Investigation Of Pakistan) 'एनआयए'कडे (NIA) देण्यात यावा. तसंच ज्या तक्रारी झाल्या आहेत त्याचा तपास देखील 'सीआयडी'ने करावा, अशी मागणी केली आहे.

Satara Riots Investigation
भारतीय मानवाधिकार परिषदेची मागणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 5:03 PM IST

सातारा दंगली प्रकरणी मत मांडताना माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी

पुणे Satara Riots Investigation :माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषद घेत हा अहवाल सादर केला आहे. ऑगस्ट-सप्टेंबर 2023 दरम्यान सातारा शहर आणि जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दंगल घडली होती. सोशल मीडियावर त्यावेळी भडकाऊ पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या. यात एका समुदायाच्या सदस्याचा दंगलीत मृत्यू झाला होता आणि पुसेसावळी गावातील हल्ल्यात सुमारे 10-15 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेतील गुन्ह्यांमध्ये 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 दरम्यान सातारा शहर आणि पुसेसावळी येथे सहा अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात सोशल मीडिया मेसेजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय मोबाइल कोड 092 हा पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानात नोंदणी केलेल्या मोबाईलवरून सातारा शहरातील लोकांना धमकीचे संदेश येत असल्याची बाब गंभीर आहे. यात समाजकंटकांचा सहभाग तर आहेच. पण, सीमापार संपर्काचे गांभीर्यही लक्षात घ्यावे लागेल, असं यावेळी माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी यांनी सांगितलं.

खरी परिस्थिती मांडण्याची जबाबदारी समितीवर :या घटनांचा स्थानिक लोकांवर होणारा परिणाम आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय मानवाधिकार परिषदेने या समस्येत हस्तक्षेप करण्याचं ठरवलं. घडणाऱ्या घटनांची साखळी, घटनांचे मूळ आणि त्यामागील कारणे शोधण्यासाठी एक सत्यशोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यावर सर्वसमावेशक सत्यशोधन अहवाल सादर करून या घटनांचे निरनिराळे स्वरूप, पुसेसावळी व सातारा शहरात त्या काळात काय घडले याचे खरे चित्र मांडण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली. त्यानुसार परिषदेच्या सत्यशोधन समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यातील निरीक्षणे आणि शिफारशी मांडल्या आहेत.

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने संताप :गुन्ह्यांची प्रतिक्रिया अतिशय तीव्र आणि संतापजनक होती. यासंदर्भात संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच सातारा शहर पोलीस ठाण्याचे फडतरे यांना आवश्यक कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. सातारा शहरातील गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच तीन दिवसांनी 18/8/2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. ही बाब प्रथम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात पसरली आणि समाजातील विविध स्तरातून त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. शहरातील एका समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता.

'त्या' व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नंबर :कौन्सिलने केलेल्या चौकशीत असं दिसून आलं की, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता जो एक सशुल्क गट आहे. ज्यामध्ये सुमारे 108 सदस्य आहेत. ज्यात 6-7 पाकिस्तानी नंबर आहेत (+92). या ग्रुपद्वारे नवीन संदेश तयार आणि प्रसारित केले जातात. गटातील पाकिस्तानी सहकाऱ्याचे संकेत धोकादायक आहेत ज्याची सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या संमतीने चौकशी होणे अपेक्षित आहे. याचा स्थानिक लोकांकडे तंत्रज्ञानाचा आधार असेल का, याबद्दल शंका आहे. त्यामुळे पोलिसांनी हा संवेदनशील विषय व्यावसायिक पद्धतीने हाताळला नाही. +92 सह मोबाईल क्रमांकाने दर्शवल्यानुसार स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या उपस्थितीची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.

हेही वाचा:

  1. Shambhuraje Desai Visited Pusesavali: दंगलीनंतर दहा दिवसांनी साताऱ्याच्या पालकमंत्र्यांची पुसेसावळीला भेट, पीडिताच्या कुटुंबानं 'ही' केली मागणी
  2. Ajit Pawar Satara Visit: उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक साताऱ्यात, दंगल झालेल्या पुसेसावळी गावाला दिली भेट
  3. Satara Riots Case : सातारा दंगल प्रकरण; सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांचा 'पीएफआय'शी संबंध?

ABOUT THE AUTHOR

...view details