बारामती -बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर मद्यधुंद ट्रक चालकाने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. या ट्रकचालकाचा पाठलाग करून येथील सागर खलाटे या तरुणाने धाडसाने हा ट्रक थांबविला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर घटनेत रिक्षाचालक व एक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र रिक्षाचे बरेच नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली.
बारामतीत मद्यधुंद ट्रक चालकाने दिली सहा वाहनांना धडक - baramati breaking
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर मद्यधुंद ट्रक चालकाने पाच ते सहा वाहनांना धडक दिली.
![बारामतीत मद्यधुंद ट्रक चालकाने दिली सहा वाहनांना धडक मद्यधुंद ट्रक चालक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10117678-260-10117678-1609768279677.jpg)
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर आज सकाळी ऊस वाहतूक करणारा ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत वाहनांना धडका देत होता. हा थरार नागरिकांच्या दृष्टीस पडला. समोरून येणारा ट्रक वाहनांना धडका देत पुढे येत असल्याचे पाहून रस्त्यावरील अनेक वाहनधारकांना आपापली वाहने सुरक्षित स्थळी नेण्याची कसरत करावी लागली. दरम्यान खलाटे या तरुणाने मोटर सायकल वरून येथील न्यायालयापर्यंत ट्रकचा पाठलाग करून मोठ्या धाडसाने ट्रक थांबविला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. सदर ट्रकचालकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा-महाराष्ट्रातील आठ जणांना नव्या कोरोना स्ट्रेनची लक्षणे; राजेश टोपे यांची माहिती