पुणे :राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजां बाबत ( Chhatrapati Shivaji Maharaj )वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभर राज्यपाल हटवण्याची मागणी ( Demand for ouster of Governor Koshyari ) करण्यात येत आहे. विविध संघटना विरोधी पक्षाकडून राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहेत.
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी थोड्याच दिवसात जाणार; शिंदे सरकारमधील आमदारांचे मोठे वक्तव्य - Eknath Shinde government
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) थोड्याच दिवसात जाणार असल्याचे वक्तव्य बाळासाहेबांची शिवसेना ( Shiv Sena of Balasaheb ) पक्षाचे प्रतोत आमदार भरत गोगावले ( MLA Bharat Gogawle ) यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

राज्यपाल हटाव -बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रतोत आमदार भरत गोगावले यांनी मोठ विधान केले आहे.ते म्हणाले की राज्यपाल हे आत्ता जाण्याच्या तयारीत आहे. थोड्याच दिवसात जातील. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचे वक्तव्य गोगावले यांनी केले आहे. पुण्यात आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून पुण्यात प्रथमच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तसेच आमदार भरत गोगावले हे देखील उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते.
शिवाजी महाराज हे आमचे दैवत - राज्यात सध्या जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान केलं जात आहे. यावर गोगावले यांना विचारलं असता ते म्हणाले की, कुठल्याही पक्षाचे नेते असो की, कार्यकर्ते असो कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान करू नये. ते आम्ही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून त्यांचं मान हे सर्वांनी ठेवलं पाहिजे असे गोगावले यांनी म्हटले.