पुणे :गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा हा 20 डिग्री नॉर्थला असून सामान्य परिस्थितीपेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यातील कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात घाट विभागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता : हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण गोवा याठिकाणी पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. गोवा महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर 22 ते 24 जुलै पर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोवा महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 22 ते 24 जुलै पर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.