पुणे -राज्यातील खासगी डॉक्टरऑक्सिजनचा अतिवापर करतात, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.राज्य सरकार खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना वेठीस धरत असल्याचा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशनने याचा निषेध केला आहे. जिथे ऑक्सिजन खाटा आहेत, तिथे एका मिनिटाला 7 लिटर आणि व्हेंटिलेटर खाटांसाठी मिनिटाला 12 लिटर ऑक्सिजन द्यावा, असे परिपत्रक राज्य सरकारने काढला आहे. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकामुळे खासगी रुग्णालयात ऑक्सिजन अधिक वापरला जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे आणि त्यासाठी हे परिपत्रक काढल्याचा आरोप आयएमएचे आहे.
मात्र, ऑक्सिजन वापराबाबतच्या पत्रकामुळे मृत्यूदर निश्चितच वाढेल, अशी भीती इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाचे अपयश लपवण्यासाठी महाराष्ट्र सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून सरकारला डॉक्टरांवर विश्वास नसेल तर, त्यांनी खासगी रुग्णालय स्वतः चालवावीत, अशी प्रतिक्रिया डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध खासगी डॉक्टर यांच्यात वाद सुरू असलेला पाहायला मिळत आहे.