पुणे- पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथक व नारायणगाव पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये ३५ ते ४० लाख रुपयांचा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक; ट्रकसह गुटखा जप्त - Pune- Rural terrorist squad
राज्यात गुटखा बंदी असतानाही पुणे-नाशिक महामार्गावरून गुटख्याची मोठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे-ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून पुण्याकडे जात असलेल्या टाटा कंपनी ट्रक क्र. (एम.एच. ०४ एफ.जे ८४६०) ला ताब्यात घेतले.

राज्यात गुटखा बंदी असतानाही पुणे-नाशिक महामार्गावरून गुटख्याची मोठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथक व नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून पुण्याकडे जात असलेल्या टाटा कंपनी ट्रक क्र. (एम.एच. ०४ एफ.जे ८४६०) ला ताब्यात घेतले. सोमवारी अन्न व औषध विभाग पुढील कारवाई करणार असल्याचे नारायणगाव पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा-मेट्रो ट्रेनचे दोन्ही संच नागपूरहून पुण्याला रवाना; पुण्यात लवकरच मेट्रो ट्रेनचे आगमन