महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत वाळू तस्करांची दोन तलाठ्यांना मारहाण... - pune crime news

बारामती तालुका हद्दीत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक याला प्रतिबंध घालण्यासाठी तहसीलदार विजय पाटील यांनी एका पथकाची नेमणूक केली. दरम्यान, या पथकाला 12 मार्चला पहाटेच्या सुमारास कर्‍हा नदीच्या पात्रात अवैध उपसा होत असल्याचे आढळले. या पथकाने तिथे जाऊन विचारपूस केली. मात्र, त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. दरम्यान, वाळू तस्करांनी दोन तलाठ्यांशी वाद घालून मारहाण केली आणि फरार झाले.

illegal-sand-mining-in-baramati
बारामतीत वाळू तस्करांची दोन तलाठ्यांना मारहाण...

By

Published : Mar 13, 2020, 8:15 PM IST

पुणे - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. त्यामुळे वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसील कार्यालय वाळू तस्करांवर करडी नजर ठेऊन आहे. अशातच वाळूचोरी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील दोन तलाठ्यांना वाळू तस्करांनी मारहाण केली.

बारामतीत वाळू तस्करांची दोन तलाठ्यांना मारहाण...

हेही वाचा-कोरोना : मास्क अन् सॅनिटायझरचा काळाबाजार; पुण्यातील चार मेडिकल दुकाने सील

बारामती तालुका हद्दीत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक याला प्रतिबंध घालण्यासाठी तहसीलदार विजय पाटील यांनी एका पथकाची नेमणूक केली. यात भापकर गावचा तलाठी विश्वास शिंदेयासह, सुरेश जगताप, प्रवीण जोजारे, बाळासाहेब वनगे यांचा समावेश आहे. दरम्यान, या पथकाला 12 मार्चला पहाटेच्या सुमारास कर्‍हा नदीच्या पात्रात अवैध उपसा होत असल्याचे आढळले.

या पथकाने तिथे जाऊन विचारपूस केली. मात्र, त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. दरम्यान, वाळू तस्करांनी दोन तलाठ्यांशी वाद घालून मारहाण केली आणि फरार झाले. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गाव कामगार तलाठी बाळासाहेब वनवे यांच्या तक्रारीवरुन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details