पुणे -दौंड तालुक्यातील आलेगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या पाच बोटी जिलेटीनच्या सहाय्याने फोडण्यात आल्या. बारामती गुन्हे शाखा, दौंड पोलीस आणि दौंड महसूल विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
दौंड: भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई - अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई
दौंड पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाने आलेगाव येथे छापा टाकला.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाने आलेगाव येथे छापा टाकला. या वेळी भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळु उपसा करणाऱ्या पाच फायबर बोट आढळून आल्या. या बोटींमध्ये सुमारे वीस ब्रास वाळूही मिळाली. बोटी आणि वाळू असा अंदाजे 29 लाख रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला.
हेही वाचा - मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप
दौंड तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने फोडल्या. या कारवार्ईमध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सहभाग होता.