पुणे - एटीएसच्या मुंबई पथकाने पुरंदर तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई केली. या कारवाईदरम्यान तब्बल पाच कोटींचा मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अमली पदार्थ विक्री करणारे महेंद्र परशुराम पाटील (वय-49) व संतोष बाळासाहेब आडके (वय-29) या दोघांना अटक करण्यात अली असून त्यांच्याकडून 14 किलो 500 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे.
एटीएसच्या कारवाईत 5 कोटींचे अमली पदार्थ जप्त; दोघे गजाआड - pune crime news
एटीएसच्या मुंबई पथकाने पुरंदर तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई केली. या कारवाईदरम्यान तब्बल पाच कोटींचा मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
एटीएसच्या मुंबई पथकाने पुरंदर तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई केली.
यांमधील संतोष आडके या आरोपीची सासवड येथे स्वतःची अल्फा केमिकल्स नावाची कंपनी आहे. यामध्ये संबंधित अमली पदार्थ बनवण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात उपलब्ध साहित्यातून जवळपास 200 किलो मेफेड्रोन बनवले जाऊ शकत होते. याप्रकरणी कलम 8 क , 22 ,29 , एनडीपीएस कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.