पुणे -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला आपली आरोग्य यंत्रणा धैर्याने तोंड देत असताना सप्टेंबरमध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील याबाबत भाष्य केले असून तिसरी लाट गृहीत धरून राज्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारले जावे, आवश्यक औषध साठा ठेवण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सप्टेंबरमध्ये येणाऱ्या या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे या सध्या वेगाने लसीकरण होणे गरजेचे असल्याचे मत अनेक डॉक्टर व्यक्त करत आहे.
नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश -