पुणे -मी आजपर्यंत कोणतीच निवडणूक हरलेलो नाही. कोल्हापूरमधून आजही निवडणूक लढवण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे थेट आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना दिले आहे. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या प्रथम वर्षपूर्ती कार्य अहवालाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या मैदानात, थेट टीकाकारांना आव्हान -
कोथरूडमधून निवडून आलो तरी कोल्हापूरहून पळून आले, अशी टीका विरोधकाकडून होत आहे. पण मी अशा टीकेला भीत नाही. आजही कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील आमदाराने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक लावावी. मी निवडणूक लढायला तयार आहे, असे आव्हान पाटील यांनी टीकाकारांना दिले.