महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amruta Fadnavis कुटुंबवाद जर बाजूला ठेवला तर शिंदेच खरे शिवसेनेचे उत्तरदायित्व - अमृता फडणवीस - Shinde is the real responsibility of Shiv Sena

मुख्यमंत्री शिंदे यांनी दीड महिन्याच्या आधी शिवसेनेत बंड पुकारून 50 आमदारांसह भाजप बरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे यांचा प्रयोग माहाविकास आघाडी सरकारच्या अस्थित्वा आधीच व्हायला हव होत का, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारला असता त्या म्हणाल्या की मला अस वाटत की, कुटुंबवाद जर बाजूला ठेवला तर शिंदेच खरे शिवसेनेचे उत्तरदायित्व आहेत. तसेच, तेच खर शिवसेना पुढे नेण्याचे काम करत आहेत.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

By

Published : Aug 20, 2022, 7:22 PM IST

Updated : Aug 20, 2022, 9:10 PM IST

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीड महिन्याच्या आधी शिवसेनेत बंड पुकारून 50 आमदारांसह भाजप बरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे यांचा प्रयोग माहाविकास आघाडी सरकारच्या अस्थित्वा आधीच व्हायला हव होत का, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारला असता त्या म्हणाल्या की मला अस वाटत की, कुटुंबवाद जर बाजूला ठेवला तर शिंदेच खरे शिवसेनेचे उत्तरदायित्व आहेत. Shinde Vs Shiv Sena तसेच, तेच खर शिवसेना पुढे नेण्याचे काम करत आहेत. असही यावेळी फडणवीस म्हणाल्या आहेत. वाघोली येथे अमृता फडणवीस यांनी शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील अनाथ मुला मुलींशी थेट संवाद कार्यक्रमा हजेरी लावली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

तशी कुवत त्यांच्यात आहेशिवसेनेकडून सातत्याने शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणून उल्लेख केला जात आहे यावर अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या, की सभागृहात एकनाथ शिंदे यांचे भाषण जे झाले त्यात त्यांनी सगळे सांगितल आहे. आणि त्यानंतर कोणीही अस म्हणू शकत नाही की ते गद्दार आहेत. शिंदे यांचे नेतृत्व हे आधीपासून मिळायला हवे होत त्याला उशिर झाला असही ते म्हणाल्या आहेत. आत्ता त्यांना मिळालेल्या संधीच ते सोनं करतील तशी कुवत त्यांच्यात आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचे म्हणजे आता योग्य माणसाची योग्य जागी निवड झाली आहे. तसेच, अस्थिर सरकारही गेले असून फास्ट चालणारे सरकार आले आहे. असही त्या म्हणाल्या आहेत.

मुंबईच्या लोकांना एक चांगले आयुष्य मिळणार मुंबई महापालिकेत भाजपचा झेंडा फडकवेल अस आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे. यावर अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की शिवसेनेच्या पहिल्या गटाचे राज्य हे 25 वर्ष मुंबई महानगर पालिकेवर राहील. एवढे वर्ष राज्य असूनही आपल्या नद्या, समुद्र, रस्ते, वाहतूक आणि विकास बिलकुलच मागे राहील आहे. ज्याप्रमाणे ते पुढे यायला पाहिजे होत त्याप्रमाणे ते पुढे आले नाही. आणि आता बदलाव येणे गरजेचे आहे. आणि या बदलावानेच मुंबईच्या लोकांना एक चांगले आयुष्य मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत बदलाव भगवा जरुरी आहे अस देखील यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

अजित पवार यांच्या जीवनात खूप काही आहे लिहिण्यासारखे आहे पहाटेच्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथ विषयी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या, की देवेंद्र गॉगल मास्क घालून कुणाला भेटायला जायचे हे माहीत नाही. मी अस नाही म्हटलं की ते एकनाथ शिंदे यांना भेटायला जात होते. मी अस म्हटलं की ते गॉगल मास्क घालवू कुणाला भेटायला जात होते, अजित पवारांना, एकनाथ शिंदेंना की अशोक चव्हाणांना ते त्यांनाच माहीत होते. पहाटेच्या शपथविधीबद्दल मला एवढे माहीत आहे, की तो गनिमी कावा होता. पुढे काही आतल्या गोष्टी असेल तर ते त्यांना माहीत असेल यांची पुस्तके येणार आहे. ते येतील तेव्हा वाचू. ज्यांची पुस्तके येणार आहेत त्यात कळेल म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या जीवनात खूप काही आहे लिहिण्यासारखे अस देखील यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

हेही वाचा -मुंबई पालिकेवर भगवा फडकवायला सज्ज रहा, आशिष शेलारांनी निवडणुकीचं रणशिंग फुकलं

Last Updated : Aug 20, 2022, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details