महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mokka action Pune : मी देखील मोक्का कारवाईचे शतक ठोकणार; पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे शहराचे याआधीचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 114 हून अधिक मोक्का अंतर्गत कारवाई (Mokka action Pune) केल्या आहे. आत्ता पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune Police Commissioner Ritesh Kumar) यांनी देखील याची सुरुवात केली असून (Pune Crime) मी देखील मोक्का कारवाईचे शतक (score century of Mokka action) करणार असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले आहे. (Latest news from Pune)

Mokka action Pune
पोलीस आयुक्त रितेश कुमार

By

Published : Jan 6, 2023, 9:32 PM IST

पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे : 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 7 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत पुणे शहर येथे आयोजित करण्यात येणार असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कुमार यांनी माहिती दिली. (Mokka action Pune) पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कोणत्या गँगच्या माध्यमातून दहशत पसरवली जात आहे. (score century of Mokka action) पोलिसांकडून कोयता गँग वर कारवाई देखील केली जात आहे. मात्र असं असताना देखील पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune Police Commissioner Ritesh Kumar) यांना विचारले असता ते म्हणाले की मी जॉईन झाल्यानंतर 15 दिवसांपासून या कोयता गँगची ॲक्टीव्हीटी पाहत आहे. (Pune Crime) कालच एका गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. (Latest news from Pune)

गुन्हेगारांवर पोलिसांची नजर :शहरातील विविध ठिकाणी वाढत असलेल्या या कोयता गँग बाबत पोलिसांनी योग्य तो प्लॅन केला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी कुमार यांनी सांगितले. तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून मागील 6 ते 7 वर्षापूर्वीचा गुन्हेगारांचा इतिहास काढून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे देखील कुमार यांनी यावेळी सांगितले.

जुनाएल जस्टिस बोर्डचा घेणार आधार :शहरातील विविध ठिकाणी कोयता गँगवर कारवाई करण्यात येत असून पुढील महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या गँगमध्ये जे अल्पवयीन मुले आहे त्यांच्यासाठी 2015 सालच जुनाएल जस्टिस बोर्ड मध्ये जाऊन ते प्रावधान वापरणार असल्याचे देखील पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का?
शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कोणत्या गँगच्या माध्यमातून दहशत पसरवली जात आहे. पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र, असे असताना देखील पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही कमी होण्याचे नाव घेत नाही. कोयता गॅंगचा असाच एक गुन्हा समोर आला आहे. पुणे शहरातील भवानी पेठेतील तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असे म्हणत कोयता गँग कडून हॉटेल निशा रेस्टॉरेन्टची 5 ते 6 जणांकडून तोडफोड (Koyta gang Vandalism on Hotel Nisha Resta) करण्यात आली आहे. याबाबत लष्कर पोलीस पोलीस स्टेशन मध्ये 6 अनोळखी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.(Koyta Gang Crime)

हॉटेल निशा रेस्टॉरंटवर हल्ल्याचा प्रयत्न: तक्रारदार मोनिष म्हेत्रे हे त्यांच्या कुटुंबासह भवानी पेठेत (Bhawani Pethe in Pune) राहत असून ते राहत असलेल्या बिल्डींगचे तळमजल्यावर त्यांच्या मालकीचे हॉटेल निशा रेस्टॉरेन्ट 388 भवानपिठ प्लॅट नं 105 तळमजला हे खुप जुने आहे. हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत चालू असते. हॉटेलमध्ये चहा नाष्ठ इत्यादी खाद्य पदार्थाची विक्री केली जाते. काल 5 जानेवारीला नेहमी प्रमाणे आमचे हॉटेल उघडले व ग्राहकांना पदार्थची विक्री कामगार करत होते.

कोयता गॅंगची दहशत संपेल का? तक्रारदार मोनिष म्हेत्रे सांगितले की, दुपारी साडे तीनच्या सुमारास हॉटेलमध्ये गर्दी कमी असल्याने माझ्या हॉटेल मध्ये कामगार संतोष, आझीम हे हॉटेलमध्ये ग्राहक पाहत होतो. मी हॉटेल समोर पार्किंगच्या ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी टू व्हीलर गाडीवरून पाच ते सहा मुले आली त्यांनी तोंडाला रुमाल व डोक्यात टोपी घातलेली होती. त्याचे हातात लोखंडी कोयता, हॉकी व रॉड होते. ते आमचे हॉटेलमध्ये गेले त्यावेळी मी काउंटर दिसलो नाही. म्हणुन ते परत बाहेर आले व मला पाहून त्यातील तीघेजण माझ्या अंगावर पार्किंग मध्ये धावुन आले व त्यानी मला शिवीगाळ करून मला म्हणाले की " तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का ? असे म्हणाले. त्याचे वय अंदाजे 25 ते 26 अंगाने सडपातळ अंगात जीन्स पेन्ट तोडावर रुमाल बांधलेले होते व हॉटेलच्या आतमध्ये दोन ते तीन जणांनी तोडफोड करून नुकसान केली. व सर्वजण तिथुन निघुन जाताना माझ्याकडे रागाने मला पाहुन शिवीगाळ करुन निघुन गेले, असे तक्रारदार मोनिष म्हेत्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान घटनेचा तपास पोलिस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details