महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मी शरद पवारांचा अपमान केला नाही; मला त्यांच्याबद्दल कायम आदरच' - चंद्रकांत पाटलांवर टीका

शरद पवार हे राजकारणातील छोटे नेते आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीकांचा भडीमार होऊ लागल्यावर मी शरद पवारांचा अपमान केला नाही. मी त्यांच्याबद्दल कायम आदरानं बोललोय, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By

Published : Nov 22, 2020, 8:35 PM IST

पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून चंद्रकांत पाटलांवर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी 'मला शरद पवारांचा अनादर करायचा नव्हता. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, असं सांगतानाच राजकारणात टीका होतंच असते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

पवार साहेंबाबद्दल मला आदरच-

पाटील म्हणाले, पवार साहेबांबद्दल कुठलाही अनादर व्यक्त करायचा नव्हता. तुम्ही मोदींवर, अमित शाह आणि देवेंद्रजीना टरबूज्या आणि मला चंपा म्हंटलेले चालते. मात्र, पवार साहेबांबद्दल मी नेहमी आदराने बोलतो. चांगलं बोललो तेव्हा कधी प्रतिक्रिया आल्या नाहीत. पवार साहेबांबद्दल चांगले बोललो तरी कधी कौतुक केले जात नाही. माझे कालचे वक्तव्य हे ओबीसी आरक्षणासंदर्भातील होते. पवारांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलत राहू दे, असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

अजित पवारांना आता कसा वेळ मिळाला-

शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, काही नेते राज्यातील प्रश्नांवर बोलताना दिसले नाहीत. पण माझ्यावर टीका करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला. अजित पवार महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत, आणि यावर बोलायला त्यांना वेळ कसा मिळाला.

ट्रोलला आम्ही घाबरत नाही-

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले, ज्यांचा झेंडा एक नाही, ज्यांचे विचार एक नाहीत ते मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे. या सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे, शाळांच्या बाबतीत एकमुखाने निर्णय होत नाही. मुलांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे. यावर काही बोलले तर ट्रोल करण्यासाठी त्यांची पेड टीम तयार आहे. मात्र आम्ही ट्रोलला घाबरत नसल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

लॉकडाऊन सुरू करण्यात अर्थ नाही-

आर्थिक गाडे उलटे नेण्यात काही अर्थ नाही. काळजी घेऊन हे सर्व सुरूच ठेवावे लागेल. राज्यात लॉकडाऊन केला तर सर्वच बंद करावे लागेल. त्यामुळे कोरोनासोबत जगताना काही नियम घालून द्यावे लागतील, पण राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यात काही अर्थ नाही नसल्याचे ही पाटील यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details