बारामती(पुणे) - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. जानकर-पवार भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. जानकर महाविकास आघाडीत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. यावर जानकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही भेट राजकीय नसून साखर कारखान्याच्या प्रश्नांशी संबंधित होती, असे जानकर यांनी इंदापूर येथील पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मी महायुती बरोबरच आहे; माध्यमांनी चर्चा थांबवावी - महादेव जानकर - jankara join maha aghadi
महादेव जानकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी महाआघाडीला माझी गरज नाही, मी महायुतीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण जानकर यांनी दिले आहे.
महाविकास आघाडीला माझी गरज नाही-
महादेव जानकर यांनी ३ डिसेंबरला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली होती. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचे जाहीर केले आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याचे जानकर यांनी सांगितले. तसेच मीडियाने या चर्चेला पूर्णविराम द्यावा, माझी महाविकास आघाडीला गरज नाही. माझे फक्त दोनच आमदार आहेत, असेही जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
रासप हा एनडीएचा घटक पक्ष -
सध्या माझे दोनच आमदार आहेत. ९८ जिल्हा परिषद सदस्य, २ पंचायत समिती सदस्य, ३ नगरपालिका सदस्य. 23 राज्यात पक्षाला मान्यता आहे. जेव्हा माझे वीस-पंचवीस आमदार येथील व माझ्या चौकात जेव्हा माझी ताकद वाढेल तेव्हा मी योग्य निर्णय घेईल. मात्र आज रासप हा एनडीएचा घटक पक्ष आहे. आणि मी त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले-