पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात ऑटोमॅटिक मशीनद्वारे हायजिनिक पाणीपुरीचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे. शहरातील आकुर्डी येथे काही उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खास पाणीपुरी प्रेमींसाठी मशिनद्वारे पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केलाय. या पाणीपुरीचा दर 20 रुपये प्लेट असून ग्राहकांना ही पाणीपुरी भुरळ घालत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ऑटोमॅटिक मशीनची पाणीपुरी... 'हायजिनिक चाट'ची ग्राहकांना भुरळ - chats in pune
कोरोनामुळे अनेक पाणीपुरी प्रेमी स्वतःवर नियंत्रण ठेऊन होते. परंतु, आकुर्डी येथील ऑटोमॅटिक मशीनची पाणीपुरी बघताच तोंडाला पाणी सुटते. त्यातच स्वच्छता आणि स्पर्शविरहीत पाणीपुरी असल्याने अनेकांच्या ती पसंतीस उतरली आहे. तसेच विविध फ्लेवरमध्ये पाणीपुरी उपलब्ध असल्याने ग्राहकांची गर्दी असते.
कोरोनामुळे अनेक पाणीपुरी प्रेमी स्वतःवर नियंत्रण ठेऊन होते. परंतु, आकुर्डी येथील ऑटोमॅटिक मशीनची पाणी पुरी बघताच तोंडाला पाणी सुटते. त्यातच स्वच्छता आणि स्पर्शविरहीत पाणीपुरी असल्याने अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच विविध फ्लेवरमध्ये पाणीपुरी उपलब्ध असल्याने ग्राहकांची गर्दी असते.
कोरोनाचे संकट बघता नागरिकांना हायजिनिक गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे पाणीपुरीचा व्यवसाय करायचा ठरवले. पाच जणांनी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू केला. स्पर्श न होता पाणीपुरी ग्राहकांना पुरवण्यासाठी ऑटोमॅटिक मशीनचा वापर केला आहे. हात न लागता पाणीपुरी मिळत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे कौस्तुभ चाफळकर यांनी सांगितले.
हायजिनिक जागा असल्याने आम्ही इथे पाणीपुरी खायला येत आहोत. हात न लावता पाणीपुरीचा आस्वाद घेता येतोय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अतिशय कमी आहे, असे रेखा राणे या ग्राहकाने सांगितले.