महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्रांतीकारक हुतात्मा राजगुरू वाड्यावर दिपोत्सव - rajgurunagar diwali celebrataion

दिवाळीनिमित्त क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरुनगर येथील जन्मठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन हुतात्मा राजगुरुवाडा दिपोमय केला.

क्रांतीकारक हुतात्मा राजगुरु वाड्यावर दिपोत्सव

By

Published : Oct 29, 2019, 2:29 PM IST

Updated : Oct 29, 2019, 5:55 PM IST

पुणे -दिवाळीनिमित्त घरापासून ते शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी विविध रंगांच्या प्रकाशात, पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला जातो. त्याच उत्साहात दिवाळीनिमित्त क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरुनगर येथील जन्मठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन हुतात्मा राजगुरुवाडा दिपोमय केला. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता.

क्रांतीकारक हुतात्मा राजगुरू वाड्यावर दिपोत्सव

हेही वाचा - जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला तडा; ९० दिवसात १० हजार कोटींचे नुकसान

गेल्या आठ दिवसांपासून समाज माध्यमावर 'जाणीव ग्रुप'च्या माध्यमातून राजगुरू वाड्यावर होणाऱ्या दिपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत गावागांवातील व राजगुरुनगर शहरातील तरुण-तरुणी महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या गावातील एक तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा देऊन हसत-हसत फासावर गेला, त्याच हुतात्म्याच्या जन्मभूमीत दिवाळीनिमित्त पाडव्याच्या दिवशी संपूर्ण राजगुरुवाड्यावर पणत्या लावून लखलखीत करण्यात आला होता.

क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंच्या जन्मवाड्याच्या प्रवेशद्वारापासून ते जन्मखोलीसमोरील उद्यान आणि ध्वजस्तंभ परिसरात दिवे लावण्यात आले होते. पवित्र अशा भिमानदीच्या तिरावर असणाऱ्या या क्रांतीकारकाच्या वाड्याचे दिपोत्सवामुळे रुप वेगळे बनले होते. डोळे दिपवून टाकणार हा दिपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

हेही वाचा - 'मानलेलं जरी असलं, तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं; धनंजय मुंडेंची फेसबूक पोस्ट

Last Updated : Oct 29, 2019, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details