महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder In Pune : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून - आरोपी पतीवर गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून ( Husband stabs wife to death ) केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री येरवड्यात घडली. अंकिता अनिल तांबूटकर (वय 45, रा. दुर्गामाता मंदिरा जवळ, जय जवान नगर येरवडा) हिचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती अनिल मनोहर तांबूटकर (वय50) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Murder In Pune
येरवडा

By

Published : Nov 2, 2022, 2:22 PM IST

पुणे :चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून ( Husband stabs wife to death ) केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री येरवड्यात घडली. अंकिता अनिल तांबूटकर (वय 45, रा. दुर्गामाता मंदिरा जवळ, जय जवान नगर येरवडा) हिचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती अनिल मनोहर तांबूटकर (वय50) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

पत्नी रक्ताच्या थारोळ्यात :वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जय जवान नगर दुर्गा माता मंदिराजवळ एका महिलेवर पतीने तीक्ष्ण हत्याराने वारकरून गंभीर जखमी केल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी तात्काळ गेल्यानंतर अंकिता तांबूटकर ही महिला तिच्या घरामध्ये गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. चारित्र्याच्या संशयावरून ( Husband suspicion of wife character ) पती अनिल याने चाकूने तिच्या तोंडावर छातीवर व गळ्यावर वारकरून खून केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी केली.

खुनाचा गुन्हा दाखल :याप्रकरणी त्यांचा मुलगा अनिकेत याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती अनिल तांबूटकर विरुद्ध येरवडा पोलिसांनी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details