महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीचा खून करून पती चिंचवड पोलीस ठाण्यात हजर - पिंपरी चिंचवड न्यूज

बानू हसनसहाब नदाफ (वय ३४) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर, हसनसहाब नदाफ (वय ४१) असे आरोपी पतीचे नाव आहे.

pune crime
पतीने केला पत्नीचा खून

By

Published : Dec 6, 2019, 7:42 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपी थेट पोलीस ठाण्यात गेला. गुन्ह्याची कबुली देत पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बानू हसनसहाब नदाफ (वय ३४) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर, हसनसहाब नदाफ (वय ४१) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पतीने केला पत्नीचा खून

हेही वाचा -हैदराबाद एन्काऊंटर: पोलिसांनी कायदा हातात घेणे हे न्यायव्यवस्थेचे अपयश - असीम सरोदे

आरोपी पतीने काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला होता. त्यावरून पत्नी आणि पती या दोघांमध्ये वाद होत असत. यातूनच खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) सकाळी सहाच्या सुमारास हसनसहाब आणि पत्नी बानू यांच्यात राहत्या घरात दुसऱ्या पत्नीवरून वाद झाला. यातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी हसनसहाब याने थेट चिंचवड पोलीस ठाणे गाठत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, आरोपीने २०११ ला दुसरा विवाह केला होता. यावरून पहिल्या पत्नीबरोबर त्याचे अनेकदा वाद झाले होते. पहिल्या पत्नीला तीन मुले आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details