पुणे- सुखी संसाराचे स्वप्न उराशी घेऊन पती-पत्नी लग्न बंधनात अडकतात. सात जन्माच्या गाठी बांधतात आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात. मात्र, याच सुखी संसाराला चारित्र्याच्या संशयाची नजर लागते, अन संसाराची राखरांगोळी होते. असाच काहीसा प्रकार आंबेगाव तालुक्यातील गोहे या आदिवासी गावात घडला आहे. पत्नी वारंवार पतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे.
पुणे : पत्नीचा होता पतीच्या चारित्र्यावर संशय, दगड-काठीने मारहाण करुन त्याने संपवली कहानी - पत्नी
आंबेगाव तालुक्यातील गोहे या आदिवासी गावात पत्नी वारंवार पतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे.
सानिका संदिप करवंदे, असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. संदिप व सानिकाच्या विवाहानंतर काही दिवसांतच पत्नी सानिका आपला पती संदिप याचे बाहेर परस्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत होती. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता. हाच राग मनात धरुन संदिपने काल दुपारच्या सुमारास पत्नी सानिकाचे हात पाय बांधुन दगड व काठीने जबर मारहाण केली.
यामध्ये सानिका गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पती संदिप फरार झाला असून सानिकाची आई रेऊबाई तिटकारे यांच्या तक्रारीवरुन संदिपवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.