पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. प्रियंका निलेश देशमुख (वय-30) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून निलेश देशमुख (वय-35) असे आरोपी पतीचे नाव आहे.
शंकर अवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याकडून धारदार शस्त्राने १८ वाहनांची तोडफोड
मृत निलेश आणि प्रियंकाने काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना स्वरा नावाची 7 वर्षाची मुलगी असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी निलेशने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या प्रियंका आणि निलेश यांचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 7 वर्षांची मुलगी असून खून झालेल्या रात्री तिला मृत प्रियंकाने मैत्रिणीकडे सोडले होते. रात्री नऊच्या सुमारास स्वराला परत घेऊन जाण्यासाठी मैत्रिणीने मृत प्रियंकाला फोन केला. मात्र, तिने उचलला नाही. अनेक वेळा तिने फोन केला. अखेर तिने रात्री स्वराला थांबवून घेतले. सकाळी पुन्हा मृत प्रियंकाला मैत्रिणीने फोन केला. मात्र, तरीही तिने उचलला नाही. मनात शंका आल्याने तिने थेट तिचे घर गाठले. दरवाजा ठोठावला मात्र दरवाजा उघडला नाही.
हेही वाचा -बोगस 'रॉ' अधिकाऱ्याचा पर्दाफाश; पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात झाला होता दाखल
दरम्यान, भोसरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडला असता मृत अवस्थेत प्रियंका तर निलेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अधिक तपास केला असता प्रियंकाचा गळा दाबून निलेशने स्वतः आत्महत्या केली असल्याचे भोसरी पोलिसांनी सांगितले. निलेश हा इंदौर तर प्रियंका ही अमरावतीची आहे.