पुणे - पत्नीच्या आजारपणाच्या यातना सहन न झाल्याने पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली. वृषाली लाटे (४०) आणि संजय लाटे वय (४५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास समोर आली.
मृत दांपत्याला मुलबाळ नसल्याचही आता समोर येत आहे. पतीने आपल्या सुसाईड नोटमध्ये या सर्व प्रकाराचा उल्लेख केला आहे. त्याने लिहीले आहे की, आजारपणात पत्नीच्या वेदना पाहवत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत. पत्नीला सतत आजाराने ग्रासलेला होते. तीची तब्यत अचानक बिघडत होती. त्यामुळे आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून स्वतः संजयने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी घराचा दरवाजा खूप वेळ बंद होता त्यामुळे शेजारील व्यक्तींनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.