पुणे : पुण्यातील नवले पुलावर गेल्याआठवड्याभरापासून अपघाताचे सत्र सुरू (Huge Banners on Navle Bridge) आहे. दिवसेंदिवस नवले पुल हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये ट्रकने ४८ गाडयांना धडक दिली. त्यानंतर त्याच रात्री देखील पुन्हा दोन अपघात झाले. दोन दिवसांपूर्वी दोनदा अपघात अनेक काल पुन्हा याच नवले पुलावर अपघात झाला आहे. या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून नाऱ्हे सेल्फी पॉइंट येथे 'सावधान, पुढे नवले पूल आहे' अशा आशयाचे फलक लावण्यात आले (banners on Navle Bridge to create public awareness) आहेत.
Huge Banners on Navle Bridge : नवले ब्रिजवर जनजागृती करण्यासाठी लागले हटके बॅनर - नवले ब्रिज पुणे
पुण्यातील नवले पुलावर गेल्या आठवड्याभरापासून अपघाताचे सत्र सुरू (Huge Banners on Navle Bridge) आहे. या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून नाऱ्हे सेल्फी पॉइंट येथे 'सावधान, पुढे नवले पूल आहे' अशा आशयाचे फलक लावण्यात आले (banners on Navle Bridge to create public awareness) आहेत.
बॅनर लावण्यात आले :राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहे. या फ्लेक्सवर तीव्र स्वरूपाचा उतार आणि त्याबरोबरीने कावळ्याचा देखील फोटो दाखवण्यात आला आहे. यावर 'सावधान... पुढे नवले ब्रीज आहे' अशी रचना केली आहे. जांभुळवाडी तलावापासून ते नऱ्हे येथील सेल्फी पॉईंटपर्यंत हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर या बॅनरची चांगलीच चर्चा रंगू (banners on Navle Bridge) लागली.
नागरिकांमध्ये जनजागृती :कात्रज बोगद्यापासून थेट नवले पुलापर्यंत तीव्र स्वरूपाचा उतार असून अनेकदा मोठे वाहन चालक गाडी बंद करून अथवा न्युट्रल करून चालवतात. त्यामुळे अनेकदा वाहनाचे ब्रेक लागत नाहीत. आणि त्यामुळे मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते. त्याचेच उदाहरण आपण सर्वांनी रविवारी संध्याकाळी पाहिले. आणि एका वाहनाने ४८ वाहनांना धडक दिली. त्यामुळे या मार्गावर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी भूपेंद्र मोरे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले (Huge banners on Navle Bridge in Pune) आहेत.