महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील बुधवार पेठेत कोसळला जुना वाडा, जीवितहानी नाही - बुधवार पेठ

पुण्याच्या बुधवार पेठेत 70 ते 80 वर्षे जुन्या वाड्याचा काही भाग आज सकाळी कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हाच तो कोसळलेला वाडा
हाच तो कोसळलेला वाडा

By

Published : Mar 1, 2020, 1:26 PM IST

Updated : Mar 1, 2020, 1:38 PM IST

पुणे- पुण्याच्या बुधवार पेठेत 70 ते 80 वर्षे जुन्या वाड्याचा काही भाग आज सकाळी कोसळला. दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका वृद्ध महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

घटनास्थळ

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडूशेठ गणपती मंदिराजवळ साधारण 70 ते 80 वर्षे जुना 'सिंगलिया वाडा' आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमाराला या वाड्याचा काही भाग कोसळला असून आतमध्ये काही नागरिक अडकले असल्याचा फोन अग्निशमन दलाकडे आला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. या वाड्याचा बहुतांश भाग कोसळला होता. लाकूड, विटा, दगड यामुळे आत अडकलेक्यांचा शोध घेणे कठीण होत होते.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू व्हॅन बोलावली. या व्हॅनच्या सहाय्याने दगड माती बाजूला करत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गंगुबाई कल्याणी यांना सुखरूप बाहेर काढले. किरकोळ जखमी झालेल्या या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वाड्याचा उर्वरित धोकादायक भागही पाडला जाणार असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

हेही वाचा -सावित्रीबाई फुले विद्यापीठात 'अनुभव केंद्रा'चे उद्घाटन

Last Updated : Mar 1, 2020, 1:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details