पुणे - आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी येथे रविवारी मध्यरात्री एका घराला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत संपूर्ण घरासह, अन्नधान्य घरगुती साहित्य, कपडे जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरातील सर्व व्यक्ती बाहेर झोपलेले असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अचानक लागलेल्या आगीत घरातील धान्यासह घरगुती साहित्य जळून खाक, संसार उघड्यावर - घराला आग लागल्याची घटना
आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी येथे रविवारी मध्यरात्री एका घराला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत संपूर्ण घरासह, अन्नधान्य घरगुती साहित्य, कपडे जळून खाक झाले आहे.
रंगनाथ मांदळे असे घरमालकाचे नाव आहे. घरात अचानक आग लागल्याने स्वयंपाक घरातील सिलिंडरची टाकी असल्यामुळे प्रथम कोणीही आग विझवण्यासाठी जवळ गेले नाही. सिलिंडर टाकीचा स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज होऊन घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत घरातील सर्व साहित्य जळून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र, आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे.
पहाटेच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने संपुर्ण घर जळून खाक झाले. घरातील साहित्य, धान्य, कपडे जळून गेल्याने मांदळे कुटुंबाचा संसार पाऊसाळ्याच्या दिवसात उघड्यावर आला आहे. या घटनेचा तातडीने पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मांदळे कुटुंबाने केली आहे.