महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार हॉटेल, रेस्टॉरंट - हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू होणार

रेस्टॉरंट चालक देखील आनंदित आहेत. तर, दुसरीकडे अनेक पुणेकर खवय्ये विविध पदार्थांवर ताव मारण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, असे करत असताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे. कारण कोरोनाचे सकट अजूनही गेलेल नाही.

हॉटेल
हॉटेल

By

Published : Oct 1, 2020, 9:21 PM IST

पुणे- अनलॉक ५ मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट खुली करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल संघटनेसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दलचे संकेत दिले होते. त्यामुळे, आता सरकारच्या निर्णयानंतर व्यवसायाला पुन्हा श्रीगणेशा करण्यासाठी रेस्टॉरंटचालकांची तयारी सुरू झालेली आहे.

माहिती देताना महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार आणि हॉटेल चालक रितेश तिवारी

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अर्थचक्र सुरू करण्यासाठी सरकारने एक एक पाऊल टाकत सर्व व्यवसाय सुरू केलीत. मात्र, रेस्टॉरंट व हॉटेल्सना परवानगी देण्यात आली नव्हती. खवय्यांसाठी पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित ग्राहक येत नसल्याने काहीवेळा अन्नाची नासाडी व्हायची. त्यामुळे, व्यावसायिकांचे नुकसान व्हायचे. मात्र, आता अनलॉक ५ मध्ये रेस्टॉरंट सुरू करत असताना काही मार्गदर्शक नियम घालून देण्यात आले आहेत. या नियमांचा आम्ही पालन करू, असे आश्वासन हॉटेल चालकांनी दिले.

पुणे शहरात १५ हजाराहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट आहेत. लॉकडाऊनमध्ये या व्यवसायाला महिन्याला जवळपास ५०० कोटींचे नुकसान झाले. तसेच, पुणे शहरात जवळपास ९० टक्के हॉटेल्स हे रेंटने चालतात. त्यात अडीच लाखाहून अधिक हॉटेल कामगार काम करत आहेत. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात हॉटेलचालकांचे नुकसान झाले आहे. आता राज्य सरकारकडून हॉटेल्सबाबत गाईडलाईन्स जाहीर करण्यात आली असून ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट खुली करण्यात येणार आहे. सध्या अनेक कामगार हॉटेल्समध्ये आलेले आहेत. रेस्टॉरंट असेल किंवा हॉटेल्स यांची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, सॅनिटायझेशन केले जात आहे.

रेस्टॉरंटमधली प्रत्येक वस्तू अतिशय काळजीपूर्वक स्वच्छ केली जात आहे. रेस्टॉरंट खुले झाल्यावर कामगारांनी कसे राहावे याचे मार्गदर्शन देखील हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात येत आहेत. रेस्टॉरंट्स सुरू होत असल्याने समाधानही व्यक्त होत आहे. एकीकडे सहा महिने बंद असलेली हॉटेल्स, रेस्टॉरंटमुळे पुणेकर देखील घरचे जेवण करून कंटाळले होते. आता रेस्टॉरंट चालक देखील आनंदित आहेत. तर, दुसरीकडे अनेक पुणेकर खवय्ये विविध पदार्थांवर ताव मारण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, असे करत असताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे. कारण कोरोनाचे सकट अजूनही गेलेल नाही.

हेही वाचा-राहुल गांधीच्या अटकेच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसकडून निषेध आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details