पुणे - भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. संजय भरत सीनारे (वय 32) असे त्याचे नाव आहे. आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. आर्थिक कारणातून त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पुण्यात हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या - हॉटेल कामगाराची आत्महत्या
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. संजय भरत सीनारे (वय 32) असे त्याचे नाव आहे.
![पुण्यात हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Hotel worker commits suicide in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7819622-379-7819622-1593430647779.jpg)
पुण्यात हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
हॉटेल मालकाने तातडीने ही माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत