पुणे - पुण्यात सिंहगड परिसरात असलेल्या नवले हॉस्पिटलमध्ये डिसेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्याने आज (शनिवार) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - रुग्णालय कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
पुण्यात सिंहगड परिसरात असलेल्या नवले हॉस्पिटलमध्ये डिसेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्याने त्यांनी आज (शनिवार) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हिड आणि नॉन कोव्हिड रुग्णांची गैरसोय होत आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा रोज वाढत आहे. या हॉस्पिटलमध्ये ८० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ६० जण आयसोलेशनमध्ये आहेत. या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन सुरू केल्यामुळे रुग्णांची सकाळपासून मोठी गैरसोय होत आहे.
लॉकडाऊन काळात कामावर न आलेल्या जवळपास २०० जणांना रुग्णालय प्रशासनाने कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून पगार नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. प्रशासनाकडून अनेक आश्वासने दिली जाताहेत, मात्र पगार होत नाही. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे