पिंपरी चिंचवड Horse Worth Seven Crores :अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकारानं भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे दि.25 आणि दि. 26 नोव्हेंबर असे दोन दिवस भारतातील सर्वात मोठे देशी गोवंश व अश्व प्रदर्शन तसंच पशू आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.
'फ्रेंजेड जी'नं पशूप्रेमींचं लक्ष वेधलं :मूळचा राजस्थानी असलेल्या या घोड्याचं नाव फ्रेंजेड जी आहे. हा अश्व 4 वर्षांचा असून मारवाडी प्रकारचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून युवराजसोबत आहे. फ्रेजेंडनं आतापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच तब्ब्ल 1100 स्पर्धांमध्ये तो 'विजेता' ठरला आहे. आजपर्यंत एकाही घोड्यानं स्पर्धेमध्ये पराभव केलेला नाही. फ्रेजेंडचा खुराकही भलाभल्यांच्या तोंडाला फेस आणणारा आहे. अश्व मालक युवराज जडेजानं सांगितलं की, या घोड्याला रोज 15 लीटर दूध पितो. दररोज 5 किलो हरभरा आणि 5 किलो डाळी खातो. हा फक्त ‘मिनरल वॉटर’च पितो, असा दावा करण्यात अश्व मालकानं केला आहे.
कोण आहेत युवराज जडेजा? : युवराज हे व्यवसायानं जमीनदार आणि आडतदार आहेत. ते गुजरातचे रहिवासी आहेत. फ्रेंजेडच्या देखभालीवर दरमहा अडीच ते तीन लाख रुपये खर्च होत असल्याचं त्यांनी सांगितलं. घोड्याची काळजी घेण्यासाठी चारजण नेहमी सोबत राहतात. घोड्यांना एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खास रुग्णवाहिकेसारखी गाडी असते. घोड्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 तास एक डॉक्टरही तैनात असतो, असंही युवराज जडेजा यांनी सांगितलं. अशा घोड्याची चर्चा झाली नसती तरच नवल!
पशूंचे ‘रॅम्प वॉक’ होणार-पशुप्रदर्शनामध्ये खिल्लार, देवणी, लालकंधारी, थारपारकर, म्हैस, रेडा, कांकरेंज, गीर, डांगी, साहिवाल, पुंगनूर, मालनाड गिड्डा, कपिला गाय बैल तसंच मारवाडी व भीमथडी अश्व मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहे. पहिल्या क्रमांकाच्या गोवंश आणि पशूंचे ‘रॅम्प वॉक’ होणार आहे. असा रॅम्प वॉक हा देशात प्रथमच होणार असताना त्यासाठी अनेक पशुप्रेमी प्रदर्शनात येत आहेत.
हेही वाचा -
- गोपीचंद पडळकर घोड्यावर स्वार, तर ‘लगाम’ मात्र महेश लांडगेंच्या हातात; पाहा व्हिडिओ
- पिंपरी चिंचवड शहरात छठ महापूजा; इंद्रायणी घाटावर भाविकांनी केली अलोट गर्दी
- प्लास्टिकची पिशवी गिळल्यानं साप मोजत होता मृत्यूच्या घटका, पहा सर्पमित्रानं कसे वाचविले प्राण?