पुणे - पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव वैदवस्ती येथे बिबट्याने पाळीव घोड्याची शिकार केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. त्यामुळे वैदवस्ती परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात बिबट्याने पाडला घोड्याचा फडशा, बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी - पुणे
गेल्या अनेक दिवसांपासून नारायणगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. या परिसरात बिबट्याने अनेकवेळा पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. आज पहाटेच्या सुमारास सखाराम घाडगे यांच्या शेतात बांधून असलेल्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केला.
पुण्यात बिबट्याने पाडला घोड्याचा फडशा
गेल्या अनेक दिवसांपासून नारायणगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. या परिसरात बिबट्याने अनेकवेळा पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. आज पहाटेच्या सुमारास सखाराम घाडगे यांच्या शेतात बांधून असलेल्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये घोड्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात देखील बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.