पुणे - जिल्ह्यातील राजगड किल्ल्याजवळ उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या २०० जणांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. त्यामुळे शिक्षकांसह ७ जण गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी शालेय विद्यार्थ्यांवर मधमाश्यांच्या हल्ला - राजगड किल्ला पुणे
शिबिराच्या पहिल्याच दिवशी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह २०० जण गुंजवणी गावात जमले होते. यावेळी जवळच असलेल्या झुडपातून अचानक आलेल्या मधमाश्यांनी सर्वांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने भांबावलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वाट दिसेल त्या दिशेने धूम ठोकली.
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणी गावात ४ दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या पहिल्याच दिवशी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह २०० जण गुंजवणी गावात जमले होते. यावेळी जवळच असलेल्या झुडपातून अचानक आलेल्या मधमाश्यांनी सर्वांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने भांबावलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वाट दिसेल त्या दिशेने धूम ठोकली. गुंजवणी ग्रामस्थांनी बहुतांश शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घरात घेऊन दरवाजा बंद करत या सर्वांची मधमाश्यांपासून सुटका केली. त्यानंतर काही वेळात गुंजवणी गावाजवळ असलेल्या करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गावातील या उन्हाळी शिबिरात शिक्षक, स्वयंसेवक आणि विद्यार्थी असे २०० जण सहभागी झाले होते. मधमाश्यांनी हल्ला केला त्यावेळी शिक्षिका ज्योती कड यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्या स्वतः गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये त्यांच्यासह अशोक चव्हाण, प्रवीण वराडे, ओंकार शेलार, श्रेयस क्षीरसागर, स्वाती पाटील आणि अनुष्का रेगे हे ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.