महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CORONA : कौतुकास्पद..! टेरेसवर कौटुंबिक गप्पा मारत असताना सोशल डिस्टन्सिंग - CORONA VIRUS NEWS

गप्पा मारत असताना दोघांमध्ये काही मीटरचे अंतर ठेवले जात आहे. त्यामुळे नागरिक हे कोरोना विषाणूसंबंधी सतर्क राहत असून काळजी घेत असल्याचे दिसत आहे.

SOCIAL DISTANCING
टेरेसवर कौटुंबिक गप्पा मारत असताना सोशल डिस्टन्सिंग

By

Published : Mar 27, 2020, 10:15 AM IST

पुणे - सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानंतर विविध ठिकाणी त्याचे पालन केले जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अवघा देश लॉकडाऊन असून २१ दिवस नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नागरिकांना घरात बसून कंटाळवाणे होत असून ते सायंकाळच्या सुमारास टेरेसचा सहारा घेतात. तिथे अनेकांच्या गप्पा रंगत आहेत. मात्र, टेरेसवरही नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पालन होताना दिसत आहे.

टेरेसवर कौटुंबिक गप्पा मारत असताना सोशल डिस्टन्सिंग
जगात कोरोनाचा फैलाव झाला असून अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. अशातच देशातही काही वेगळी परिस्थिती नाही. परंतु, देशांतर्गत वेळीच पाऊल उचलल्याने त्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अवघा देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. घराच्या दारात लक्ष्मण रेषा ओढून ठेवा असे नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याचे तंतोतंत पालन नागरिक करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक नागरिकांना घरात कंटाळवाणे होते, म्हणून ते टेरेसचा सहारा घेत आहेत. दिवसभर नागरिक घरात करणार तरी काय? त्यामुळे लहान मुले, तरुण, आई, वडील, आजोबा, आजी हे सर्व एकत्र टेरेसवर जाऊन बसत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे.

गप्पा मारत असताना दोघांमध्ये काही मीटरचे अंतर ठेवले जात आहे. त्यामुळे नागरिक हे कोरोना विषाणूसंबंधी सतर्क राहत असून काळजी घेत असल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित असलेले १२ रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रत सर्वात जास्त रुग्ण हे याच शहरात होते. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. रुग्ण वाढत नसल्याने शहरात समाधानकारक वातावरण असून नागरिक बाहेर न पडता पोलिसांना सहकार्य करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details