महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा मोर्चा सनदशीर, गृहमंत्र्यांनी फोन टॅप करू नये- मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Maratha Kranti Morcha protest pune

मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी काल सरकारने काही घोषणा केल्या. त्या तरतुदी जुन्याच आहेत. त्या केवळ मराठा समाजासाठी नसून इतर खुले प्रवर्ग देखील त्यात समाविष्ट आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चा पत्रकार परिषद
मराठा क्रांती मोर्चा पत्रकार परिषद

By

Published : Sep 23, 2020, 5:18 PM IST

पुणे- मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन कॉल टॅप होत आहेत. आमच्या मनात आक्रोश असला तरीही आम्ही सनदशीर, तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. त्यामुळे, गृहमंत्र्यांनी आमचे फोन टॅप करू नयेत. अशी विनंती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केली.

राज्य सरकारने काल (२२ सप्टेंबर) मराठा समाजातील आर्थिकरित्या दुर्बल घटकांसाठी विविध घोषणा केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. मराठा समाजाला घटनेतील अनुच्छेद १५ (४) आणि १६ (४) नुसार मिळालेले एसईबीसी आरक्षण कायम राहावे, अशी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे. स्थगिती उठवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. त्याला आमचे सहकार्य आहे. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी काल सरकारने काही घोषणा केल्या. त्या तरतुदी जुन्याच आहेत. त्या केवळ मराठा समाजासाठी नसून इतर खुले प्रवर्ग देखील त्यात समाविष्ट आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

इडब्ल्यूएसचा पर्याय आगीतून फुफाट्यात पाडण्यासारखा आहे. सरकारकडून इडब्ल्यूएसचे गाजर दाखवून मराठा समाजाची दिशाभूल सुरू आहे. त्या विरोधात येत्या रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि भाजपच्या कार्यालयावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

तसेच, अण्णासाहेब पाटील महामंडळाला घोषित करण्यात आलेला निधी वाढवून मिळावा. सारथी संस्थेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून संस्था बळकट करावी. न्यायालयाचे स्थगिती आदेश येण्यापूर्वी शाळा, कॉलेजमध्ये झालेले प्रवेश, तसेच सरकारी नियुक्त्या संरक्षित कराव्यात. पोलीस भरतीतील मराठा समाजासाठी आरक्षित जागांचे काय करणार? हे सरकारने स्पष्ट करावे. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रकार परिषदेत समन्वयक राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, बाळासाहेब आमराळे, सचिन आडेकर, हनुमंत मोटे आणि प्राची दुधाने यांची उपस्थिती होती.

हेही वाचा-आतातरी गडकिल्ले सुरू करा... सिंहगडावरील स्थायिक व्यावसायिकांची सरकारला आर्त हाक

ABOUT THE AUTHOR

...view details