महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivaji Maharaj Statue Issue Amravati : काही लोक समाजातील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करताय - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - Home minister dilip walse patil on shivaji maharaj amravati statue

लीकडे एकाबाजूला देश कोरोनाशी लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला काही लोक हे वेगवेगळ्या प्रश्नांवरून समाजासमाजात अंतर निर्माण करण्याचा, परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. ( Home Minister Dilip Walse Patil on Amravati Shivaji Maharaj Statue Incident ) अमरावती येथील राजापेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर अमरावतीत ( Statue of Shivaji Maharaj Removed ) तणावाची स्थिती आहे.

Dilip Walse Patil
दिलीप वळसे पाटील

By

Published : Jan 16, 2022, 6:34 PM IST

Updated : Jan 16, 2022, 7:01 PM IST

पुणे - अमरावती येथील राजापेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर अमरावतीत ( Statue of Shivaji Maharaj Removed )तणावाची स्थिती आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अलीकडे एकाबाजूला देश कोरोनाशी लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला काही लोक हे वेगवेगळ्या प्रश्नांवरून समाजासमाजात अंतर निर्माण करण्याचा, परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ( Home Minister Dilip Walse Patil on Amravati Shivaji Maharaj Statue Incident ) ही वेळ अवघड आहे. सर्व समाजातील लोकांनी एकत्रित राहून देश आणि राज्याच्या बरोबर राहिले पाहिजे, असे आवाहनही गृहमंत्री वळसे पाटील यांनी केले. ( Home Minister Dilip Walse Patil Appealled over Shivaji Maharaj Statue Incident Amaravati )

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याबाबत बोलताना

सर्व सतर्कता घेण्यात आली आहे -

मागच्या आठवड्यात अमरावती येथे काही लोकांनी स्थानिक आमदाराच्या पुढाकाराने महापालिकेची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली. आणि परत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापन करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता हे दोन्ही पुतळे बसविण्यात आल्याने महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. कुठल्याही परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व सतर्कता घेण्यात आली आहे, असेही यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा -Statue of Shivaji Maharaj Removed : अखेर मध्यरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा काढला; राणा दाम्पत्य नजरकैदेत

अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता 12 जानेवारीला रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. हा पुतळा आज (रविवारी) पहाटे महापालिका प्रशासनाने काढून टाकल्यामुळे युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्या शंकर नगर येथील घरासमोर तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे.

Last Updated : Jan 16, 2022, 7:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details