पुणे - कोणतीही अपेक्षा न ठेवता देशासाठी, देशप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वंचितांसाठी काम करण्याची सरहदची भूमिका महत्वाची आहे, असे कौतुकोद्वार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढले. सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्यावतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाशपर्व निमित्त शहिदांना अभिवादन तसेच राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारगिलचे एक्झीक्युटीव्ह काँन्सिलर आगा सैय्यद अब्बास रिझवी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तेग बहादूर प्रकाशपर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आयोजक संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते.
हल्ली पुरस्कार खूप देण्यात येतात पण आजचे पुरस्कार विशेष -
22 वर्षापूर्वी कारगीलचे युध्द झाले. आपल्याला विजय मिळाला. कारगिल प्रदेशाची जोडलेल्या मुला-मुलींना इथे आणून त्यांना शिक्षण देण्याचे काम सरहद संस्थेच्यावतीने केले जाते. म्हणून आजचा कार्यक्रम आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली पुरस्कार खूप देण्यात येतात, परंतु पुरस्काराचे महत्व् पाहिले तर आज दिलेले पुरस्कार हे विशेष आहेत. समाजाच्या हिताच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. एखादे विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे. यातून एक नवीन आदर्श निर्माण होतो. योग्य व्यक्तींना पुरस्कार दिल्याने मनाला आनंद होतो. अशा कार्यक्रमात अधिकाधिक सहभागी झाले पाहिजे.अस यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.