महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंजवडी पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हॉटेलला ठोकले टाळे - pune latest news

हिंजवडीत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालणावऱ्या हॉटेलला पोलिसांनी सहा महिन्यांसाठी टाळे ठोकले आहे. या प्रकरणी चार जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल ग्रँड मन्नत
हॉटेल ग्रँड मन्नत

By

Published : Dec 17, 2020, 8:24 PM IST

पुणे - हिंजवडीत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालणाऱ्या हॉटेलला पोलिसांनी सहा महिन्यांसाठी टाळे ठोकले आहे. ही कारवाई आज दुपारी हिंजवडी पोलिसांनी केली आहे. हॉटेल ग्रँड मन्नत, अस कारवाई करण्यात आलेल्या हॉटेलचे नाव आहे. सप्टेंबर महिन्यात संबंधित हॉटेलवर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने छापा टाकून चार तरुणींची सुटका केली होती. या प्रकरणी चार जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गणेश कैलास पवार, युसूफ सरदार शेख, समीर उर्फ राज तय्यब सय्यद आणि हिरा नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सप्टेंबर महिन्यात हॉटेलवर छापा टाकण्यात आला होता-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हॉटेलवर सप्टेंबर महिन्यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने छापा टाकला होता. त्यानुसार, चार जणांवर गुन्हा दाखल करत चार तरुणींची सुटका करण्यात आली होती.

हिंजवडी पोलिसांनी हॉटेलला ठोकले टाळे-

याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पाठपुरावा करत संबंधित हॉटेल हे सहा महिन्यासाठी बंद करण्याचा प्रस्थाव पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना पाठविला होता. त्यानुसार सर्व बाजू तपासून कृष्ण प्रकाश यांनी हॉटेल सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज दुपारी हिंजवडी पोलिसांनी हॉटेलला सहा महिन्यासाठी टाळे ठोकले आहेत.

पोलिसांच्या या पथकाने केली कारवाई-

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे पोलीस उपाआयुक्त आनंद भोइट, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक देडगे, पोलीस उप निरीक्षक अनंत दळवी, पोलीस कर्मचारी किरण पवार, विजय घाडगे, अविनाश कुमटकर यांनी हि कारवाई केली.

हेही वाचा-संपत्तीच्या वादातून नागपुरात भरदिवसा एकाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details