पुणे- हलाल या अरबी शब्दाचा अर्थ वैध, असा होतो. इस्लामी देशांमध्ये तसेच भारतातही हलालप्रमाणित साहित्यांची मागणी आहे. हलाल हे प्रमाणपत्र केवळ खासगी इस्लामी संस्थांकडून देण्यात येते. पण, धर्मनिरपेक्ष भारत सरकारच्या 'अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI)कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खासगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का?, असा सवाल हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
धर्मनिरपेक्ष भारत सरकारची 'हलाल'प्रमाणपत्रासाठी सक्ती का..? हिंदु जनजागृती समितीचा सवाल
धर्मनिरपेक्ष भारत सरकारच्या 'अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खासगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का?, असा सवाल हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
भारत हे धर्मनिरपेक्ष देश आहे. देशात विविध जाती, धर्माचे लोक राहतात. मात्र, इस्लामिक देशांमध्ये भारतीय वस्तु निर्यात करताना किंवा देशातील काही ठराविक इस्लामिक वर्गासाठी व्यापाऱ्यांना हलाल प्रमाणित करून घ्यावे लागते. एवढेच नाही तर भारत सरकाकडून चालणाऱ्या एअर इंडिया, आयआरसीटीसीसारख्या माध्यमातून हलाल प्रमाणित साहित्य दिले जाते. यामुळे येथील व्यापाऱ्यांना शासनाच्या रमेश शिंदे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या प्रमाणपत्रासह हलाल प्रामाणित करण्यासाठी पैसे मोजावे लागते. हलाल या प्रमाणापत्रासाठी सुरुवातीच्या नोंदणीसाठी 21 हजार 500 रुपये तर प्रतिवर्ष 15 हजार रुपये मोजावे लागत आहे. देशातील तसेच राज्यातील काही नामांकीत उद्योगांनी आपले उत्पादन हलाल प्रमाणित केले आहेत. त्यामुळे हलाल ही समांतर अर्थव्यवस्था धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या आपल्या देशाने मोडून काढायला हवे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा -बारामतीमध्ये आजपासून व्यवहार सुरू, 'या' आहेत नियम व अटी