आज पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा पुणे : धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत. त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हजारो हिंदू नागरिक हे लाल महाल येथे सहभागी झाले आहे.
मोर्चामध्ये यांचा विशेष सहभाग :आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे. थोड्याच वेळात लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले आहेत.
याअगोदर पुणे बंद आंदोलन :छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली गेले होते. यामुळे भावना दुखावल्याने पुण्यातील गणेशमंडळांनी मोठा निर्णय घेतला होता. शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी १३ डिसेंबर पुणे बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले मार्केटयार्ड देखील आज बंद करण्यात आले होते. पुणे बंदमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच विविध राजकीय पक्षाला तसेच सामाजिक संघटना गणेश मंडळ यांनी या बंदला पाठिंबा दिलेला होता.
व्यापाऱ्यांचा पुणे बंदला पाठिंबा :छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एसएसपीएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीची बैठक आयोजित केली होती. 13 डिसेंबर 2022 ला पुणे बंदची हाक देण्यात आली होती. आत्ता या पुणे बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला होता. बंदमध्ये भाजप वगळता सर्वच संघटना तसेच विविध गणेशमंडळे आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटना सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा : Ratnagiri News : संजय कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले तर त्यांची राजकीय आत्महत्या - योगेश कदम