महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

14 सप्टेंबर : हिंदी दिवस का साजरा केला जातो? - हिंदी दिवस विशेष स्टोरी

आज देशभरात हिंदी भाषा दिन साजरा केला जात आहे. यामागे हिंदी भाषा जपने, वाढवणे, जागृती निर्माण करणे हा उद्देश आहे. दरम्यान, हिंदी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे.

हिंदी दिवस
हिंदी दिवस

By

Published : Sep 14, 2021, 2:10 PM IST

पुणे : हिंदी ही भारताची अधिकृत राज भाषांपैकी एक आहे. दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस भारतात हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी लोकांना हिंदीबद्दल जागरूक करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. भारत 150 वर्ष ब्रिटिशांचा गुलाम राहिला. यामुळे, त्या गुलामीचा परिणाम बराच काळ दिसून आला. ज्याचा भाषेवरही परिणाम झाला. हिंदी ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. असे असूनही, हिंदीला स्वतःच्या देशात हिंदीला स्थान नव्हते.

हिंदी दिवस का साजरा केला जातो?

हिंदी भाषा अनमोल

हिंदी भाषेला अनमोल महत्त्व आहे. हिंदी दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू हिंदी वाचवण्याचा प्रयत्न आहे. आज आपण इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व देत आहोत. ज्याला इंग्रजी येत नाही त्याला आपण कमी समजतो. साधारणपणे हिंदी बोलणे हे मागास मानले जात असे आणि इंग्रजीत बोलणे आधुनिक आणि अधिक शिक्षित मानले जाते. ही मानसिकता बदलण्यासाठी हिंदी दिन साजरा करण्यात येत आहे.

हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी

या दिनानिमित्त आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्याशी बातचीत केली. हिंदी दिवसाच्या निमित्ताने आम्हाला असे लिहायचे आहे, की 'आपली हिंदी भाषा वगळता इंग्रजीला जास्त महत्त्व देऊ नका. आपण इंग्रजी शिकले पाहिजे. पण हिंदीचे महत्त्व कमी करून नाही. हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदी दिवस साजरा केला जातो.

हिंदी जगातील सर्वाधिक भाषांपैकी एक

हिंदी भाषा जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. आपली हिंदी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. हिंदी भाषेत 11 स्वर आणि 35 व्यंजन आहेत आणि ते "देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे. हिंदी ही एकमेव अशी भाषा आहे जी इतर कोणत्याही भाषेपेक्षा समजण्यास सोपी आहे. हिंदी प्रत्येक भारतीयांना माहित असली पाहिजे. कारण त्याने आपल्याला जीवनाचे आदर्श शिकवले आहेत. हिंदी भाषेतूनच इतर अनेक भाषांचा विस्तार झाला आहे.

हेही वाचा - भाऊ विषय गंभीर, 'दारूड्या मुलांना मुली पटतात, मला लाईनही देत नाहीत, लै जीव जळतो'; कार्यकर्त्याचे थेट आमदाराला पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details