महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात ४६ कोरोनाबाधितांची नोंद, आजपर्यंतची उच्चांकी रुग्संणख्या - pimpri chinchwad corona updates

शनिवारी शहरात आढळलेल्या रुग्णांमुळे आजपर्यंतची उच्चांकी संख्या गाठली. यात २९ पुरुष आणि १७ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या ही आता ३११ वर पोहचली आहे. तर, १६९ जणांना आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, शनिवारी आणखी ९ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात ४६ कोरोनाबाधित
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात ४६ कोरोनाबाधित

By

Published : May 24, 2020, 11:04 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी आजपर्यंतचे सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात तब्बल ४६ जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं असून यात २९ पुरुष आणि १७ स्त्रियांचा समावेश आहे. तर, ९ जण करोनामुक्त झाले आहेत. शहरातील बाधितांची संख्या ३११ पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त व्यक्तींचा आकडा १६९ वर गेला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात ४६ कोरोनाबाधितांची नोंद

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चाललेला आहे. शनिवारी शहरात आढळलेल्या रुग्णांमुळे आजपर्यंतची उच्चांकी संख्या गाठली. यात २९ पुरुष आणि १७ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या ही आता ३११ वर पोहोचली आहे. तर, १६९ जणांना आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, शनिवारी आणखी ९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. शनिवारी बाधित आढळले रुग्ण हे चिंचवड स्टेशन, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी, पुण्यातील भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा आणि खडकी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, इंदिरानगर चिंचवड, आकुर्डी, चऱ्होली आणि थेरगाव येथील रहिवासी असलेल्या ९ करोनामुक्त व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे.

शहरातील काही परिसर शनिवार रात्रीपासून सील -

पिंपरी कॉलनी, पिंपरी (साई चौक - आयसीआयसीआय बँक एटीएम, डेरा संत बाबा हरिया सिंग दरबार, शाम सुंदर सुपर मार्केट, श्री मुद्रा गणेश मंदिर, गे लॉर्ड चौक, महादेव पॅटीस वाला, साई चौक) वाकड पोलीस लाईन, वाकड (सिसिम स्ट्रिट स्कूल, श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड, श्री गणेश सुपर मार्केट, आयसीआयसीआय बँक एटीएम, सिसम स्ट्रीट स्कुल) अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी (पी.एस. रेसिडन्सी, देविका स्टेशनरी, अलंकापुरम रोड, पद्मावती दुध डेअरी, पी.एस. रेसिडन्सी) परिसर शनिवार रात्री ११.०० पासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details