पुणे -' हायफाय ' चोराच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी चोर हा विमानाने येऊन घरफोड्या करत होता. अनिल राजभर असे या हायफाय चोराचे नाव आहे. या चोराला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आले आहे.
विमान प्रवास तसेच अलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्या ' हायफाय ' चोरास अटक - पुणे बातमी
हा चोर उत्तर प्रदेश येथून विमानाने मुंबई किंवा पुण्यात येवून आलिशान हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस मुक्काम ठोकायचा. तो राहत असलेल्या हॉटेल परिसरातील रेकी करून तो बंद फ्लॅटवर डल्ला मारायचा.
हा चोर उत्तर प्रदेश येथून विमानाने मुंबई किंवा पुण्यात येवून आलिशान हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस मुक्काम ठोकायचा. तो राहत असलेल्या हॉटेल परिसरातील रेकी करून तो बंद फ्लॅटवर डल्ला मारायचा. चोरलेल्या दागिन्यांची तिथेच विल्हेवाट लावून तो विमानानेच घरी परतायचा. विशेष म्हणजे हा चोर दिवसा घरफोड्या करायचा. त्याच्या दुर्दैवाने पिंपरी चिंचवडमधील घरफोडीवेळी तो सीसीटीव्हीत कैद झाला आणि या ' हायफय ' चोराचे बिंग फुटले. मुंबई आणि पुण्यात असे यापूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिसांनी तीन पथके तैनात करत, त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्याला उत्तर प्रदेश येथून जेरबंद करण्यात आले असून शहरातील दोन्ही चोऱ्या त्याने केल्याचे कबुली दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.