पुणे- गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये नोकरी निमित्त असणारे अनेक नागरिक आपल्या घरी परतत आहेत. आज रविवार आणि उद्या सोमवार या दिवशी सलग सुट्ट्यांमूळे हजारो वाहन रस्त्यावर आली आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.आज सकाळीपासूनच अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, खंडाळा या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर कंटेनर पलटला.. सलग सुट्ट्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा - पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर सलग सुट्यांमुळे वाहतूक कोंंडी; मार्गावर कंटेनर पलटला
आज रविवार आणि उद्या सोमवार या दिवशी सलग सुट्ट्यांमूळे हजारो वाहन रस्त्यावर आली आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून आज सकाळीपासूनच अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, खंडाळा या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कासवगती ने सुरू आहे.
ही परिस्थिती आज दिवसभर राहील असे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक अर्धा तास बंद होती. त्याचबरोबर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर पलटला. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. ही घटना खंडाळा एक्झिट येथे झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्ध्यासाठी थांबविण्यात आली होती. यामुळे पुणे- मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान अर्ध्या तासानंतर कंटेनरला बाजूला घेण्यात आले असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.